सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील तहसील कार्यालय दिनांक 4 ऑगस्ट 2020 रोजी सोनपेठ तालुका वंचित बहुजन आघाडी लाँकडाउन कायम स्वरूपी रद्द करणे बाबत तहसीलदार यांना
निवेदनाद्वारे खा.अँड.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील हातावर पोट असणाऱ्या सर्व कामगार, शेतमजुर, लहान व्यापारी, बेकरी वाले, अँटो चालक, चार चाकी वाले, सर्व कलावंत, बारा बलूतेदार आठरा आलूतेदार आदिंच्या उपासमारी मुळे लाँकडाउन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सतत च्या लाँकडाउन मुळे कामगार, शेतमजुर व व्यापारी यांना सरकार वेठिस धरत आहेत.प्रशासनाकडुन त्यांचा रोजगार व उपासमारीचा सरकारची आसमर्थता दिसुन येत आहे.पोटात काहीच नसल्या नंतर काहीच मार्ग सुचत नाही म्हणून सर्वप्रथम वरील सर्व घटकांना पोटा - पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो.म्हणून खा.अँड.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी
प्रशासनाला ईशारा दिला आहे की तुम्ही लाँकडाउन लावा आम्ही तोडू, तुम्ही जनतेचे पोट भरु शकत नाहीत आम्ही जनतेचे पोट भरण्यास समर्थ आहोत.करीता सोनपेठ तालुका वंचित बहुजन आघाडी च्या वतिने निवेदन देत आहोत.निवेदनावर सोनपेठ तालुका वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर शाखा पदाधीकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.



No comments:
Post a Comment