31 ऑगस्टपर्यंत ई-परवाने रद्द
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 31 ऑगस्ट पर्यंत व्यक्तीं किंवा वाहनांना या जिल्ह्यात ये-जा करिता कोणताही ई-परवाना मिळणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सोमवारी(दि.17) माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
दरम्यान, वैद्यकीय तातडीच्या कारणाची खात्री झाल्यास सदर व्यक्ती आपल्या क्षेत्रातील रहिवाशी असल्यासच परवाना द्यावा.मालवाहतुक व अत्यावश्यक सेवांना असलेल्या व्यक्तींना व वाहनांना सुट असेल. इतर कोणालाही प्रवेश मिळणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.


No comments:
Post a Comment