Saturday, August 22, 2020

श्री गणरायाचे घरोघरी जल्लोषात स्वागत विधीवत पूजेद्वारे प्रतिष्ठापना ; बच्चेकंपनीच्या आनंदास उधाण

श्री गणरायाचे घरोघरी जल्लोषात स्वागत
विधीवत पूजेद्वारे प्रतिष्ठापना ; बच्चेकंपनीच्या आनंदास उधाण




सोनपेठ (दर्शन)  :-

गेल्या साडेपाच सहा महिन्यांपासून लॉकडाऊन पाठोपाठ अनलॉकच्या टप्प्यात आपआपल्या घरांघरामधून अक्षरक्षः बंदिस्त असणा-या कुटुंबियांनी शनिवारी श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. विशेषतः बच्चेकंपनीचा आनंद ओसंडून वाहत होता. 
दरम्यान, जगावरील कोरोनाचे हे संकट दूर व्हावे, सर्व व्यवहार सुरळीत व्हावेत, हीच विनवणी गणेश भक्तांनी घरोघरी प्रतिष्ठापित केलेल्या विघ्नहर्त्याकडे केली....
यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवावर मोठ्या प्रमाणावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे गल्लीबोळामधून गणेशभक्तांचा सामुहिक जल्लोष आढळणार नाही हे स्पष्ट होते. परंतू आपआपल्या घरामधून कुटुंबियांनी मात्र श्री गणरायाचे शनिवारी (दि.22) मोठ्या आनंदाने, जल्लोषात स्वागत केले. विशेषतः बच्चेकंपनी गेल्या दोन-चार दिवसांपासून या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तयारीत दंग होती.अनेक घराघरामधून बच्चेकंपनीनी सुट्टयाच्या पार्श्‍वभूमीवर शाडूमाती किंवा काळ्यामातीचे इकोफ्रेंडली गणपती तयार केले.पाठोपाठ सुंदर असे मखर किंवा अन्य कलाकृतीही साकारल्या. 
यावर्षी श्री गणेशाच्या मूर्तीच्या उंचीवर शासनाने मर्यादा टाकल्या.त्यामुळे चार फुटापर्यंतच्या मुर्ती बाजारपेठेत उपलब्ध होत्या. कुटुंबियांनी दोन दिवसांपासूनच श्रींची मूर्तीची नोंदणी करून ठेवली.काहीनी शुक्रवारीच मूर्ती घरी नेली. शनिवारी सकाळपासून बाजारपेठामधून श्रींच्या मुर्तीची खरेदी करण्याकरिता ब-यापैकी गर्दी उसळली होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कुटुंबियांनी मोठी सावधगिरी बाळगून श्रींच्या मूर्तीची खरेदी केली. यावर्षी बाजारपेठामधून गणरायाच्या मूर्ती आल्या ख-या परंतू शनिवारी दुपारपर्यंत बाजारपेठामधून मुर्तीची कमतरता जाणवत होती.मूर्तीकारांनी यावर्षी ब-यापैकी आखडता घेतला होता.त्यामुळे विविध भावमुद्रा, रंग, आकार असणा-या मुर्ती खरेदीसाठी फारशा प्रमाणात उपलब्ध नव्हत्या.गणेशभक्तांनी सुध्दा मोह आवरला.परंतू यावर्षी श्रींच्या मूर्तीच्या किंमतीही कमालीच्या भडकलेल्या होत्या.त्यामुळे गणेशभक्तांना छोट्या आकाराच्या परंतू त्याही महागडया अशा मूर्ती खरेदी कराव्या लागल्या.  
मुख्य आठवडी बाजार डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सोमवारच्या बाजार सारखी गर्दी दिसुन आली.याप्रसंगी पोलिस गाडी सायरन वाजवत चक्कर मारत असताना गर्दी मधे हालचाल जानवली व सोशल डिस्टन्सिंग चे पालन करताना दिसुन आले.
शहरात क्वचितच गणेश मूर्ती विक्रेते दिसून आले. काही ठिकाणी विक्रेते जरी असले तरी गणेश भक्त ग्राहक मात्र, तिकडे फिरकले नाहीत. मखर, अन्य साहित्य खरेदीकरिता गणेशभक्तांचा फारसा कल दिसला नाही. दरम्यान, सकाळपासून दुपारी चारवाजेपर्यंत घरोघरी विधीवत सहकुटुंब श्रींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली.
     संपादक किरण रमेश स्वामी               सा.सोनपेठ दर्शन बातमी व                   जाहीरातीसाठि संपर्क                        मो.9823547752.








No comments:

Post a Comment