कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात पद्मश्री डॉ.रंगनाथन यांची जयंती साजरी
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरात दिनांक 12 ऑगस्ट 2020 रोजी महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम ग्रंथपाल डॉ. अनंत सरकाळे यांनी डॉ.रंगनाथन यांच्या ग्रंथालय योगदानाविषयी उपस्थितांना माहिती करून दिली.
डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला डॉ.अशोक चव्हाण डॉ. बळीराम शिंदे प्रा.गोविंद वाकणकर ग्रंथालय सहाय्यक श्री संतुक पळकर श्री बाबुराव फड आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment