सोनपेठ (दर्शन) :-
आयुर्वेदामृत काढा श्री स्वामी महेशानंदपुरी महाराज जिंतूर गुरुदेव चरणी अर्पण करून परभणीतील प्रसिद्ध नूतन आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक आणि फिटनेस सेंटरच्या संचालिका आयुर्वेदाचार्य डॉ.अर्चना पंकज ढमढेरे व डॉ.ढमढेरे सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदामृत काढा हा गंगाखेड, मानवत, जिंतूर, पाथरी, परळी वैजनाथ व सोनपेठ आदी ठिकाणी आर्य वैश्य समाज बांधवांच्या परिवारास स्थानिक आर्य वैश्य समाज बांधवांच्या हस्ते घरपोहोच जवळ-जवळ 2000 परिवारांना मोफत वाटप करण्यात आला आहे.
सोनपेठ शहरातील साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांना कोरोना योद्धा म्हणून त्यांच्या परिवारासाठी ज्ञानेश्वर ढमढेरे व अनिल कवटिकवार यांच्या हस्ते भेट स्वरूपात आयुर्वेदामृत काढा देण्यात आला व सोनपेठ शहरातील आर्य वैश्य समाज बांधवांच्या एकूण 85 परिवारात घरपोहोच आयुर्वेदामृत काढा देण्यात आला आहे.याप्रसंगी सोनपेठ आर्य वैश्य समाज बांधवांनी परिश्रम घेतले प्रत्येक समाजातील दानशूर व्यक्ती यांनी याचा बोध घेऊन आपण समाजाचे काही देणे लागतो या उक्ती प्रमाणे व्रत स्वीकारले पाहिजे.


No comments:
Post a Comment