परभणीतील सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल गंगाखेड येथील तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना पदक जाहीर
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
गंगाखेड येथील तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह राज्यातील अकरा अधिकार्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने 2020 या वर्षाचे सर्वोत्कृष्ट तपास केल्याबद्दल पदक बुधवारी (दि.12) जाहीर केले आहे.दरम्यान, श्री.शिरगावकर हे सध्या बारामतीत कार्यरत असून परभणी जिल्ह्यात कार्यरत असताना क्लीष्ट व गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा तपास केल्याबद्दल हे पदक जाहीर झाले आहे.
गंगाखेड येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी गंगाखेड उपविभागात कार्यरत असताना सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील पाच वर्षांच्या निर्भयावर अतिशय क्रूरपणे नराधमांने बलात्कार करून तिचा खून करून विहिरीत टाकून दिल्याची खळबळजनक घटना घडली होती. त्यावेळी कोपर्डी घटना व या घटनेतील संवेदनशीलता,जनतेचा आक्रोशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस यंत्रणेने गुन्ह्याचा तपास श्री.शिरगावकर यांच्याकडे सोपवला होता. तपासात या गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा केल्यानंतर शेजारील राज्यात फरार झाला होता. त्याचा 18 दिवस तांत्रिक तपास करत मागोवा घेवून कर्नाटकातुन ताब्यात घेतल्या गेले.विशेष म्हणजे या गुन्ह्याचा तपासात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना श्री.शिरगावकर यांनी गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक व वैज्ञानिक पुरावे गोळा करून त्याची पुराव्यात मांडणी केली.भौतिक पुराव्यांच्या आधारे तपासाची साखळी जोडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती.याद्वारे त्या चिमुकलीस एकप्रकारे न्याय मिळाला.या गुंतागुतीच्या तपासाची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेतल्याबद्दल श्री.शिरगावकर यांनी सा.सोनपेठ दर्शनशी बोलताना आनंद व्यक्त केला.तसेच सोनपेठ येथिल पत्रकार बांधवांना ही धन्यवाद व्यक्त केले.या प्रकरणी सहकार्य केले व भडक वृत झापले नाही कारण या वृतपत्रातुन ही अनेक प्रकरणी पोलिस बांधवांना त्रास होत असतो.


No comments:
Post a Comment