Tuesday, August 11, 2020

ही कसली संचारबंदीः आयुक्त केंद्रेकर यांचा सवाल

ही कसली संचारबंदीः आयुक्त केंद्रेकर यांचा सवाल


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात सुध्दा संपूर्ण शहरात सर्रास वर्दळ सुरू असल्याबद्दल विभागीय महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी  ही कसली संचारबंदी असा सवाल करीत जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना कठोर भूमिका घ्या, असा आदेश बजावला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयुक्त केंद्रेकर यांनी मंगळवारी दुपारी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणेतंर्गत वरिष्ठ अधिका-यांबरोबर एका बैठकीद्वारे हितगुज केले. एक-एक करीत प्रत्येक यंत्रणेचा आढावा घेतला. विशेषतः त्या-त्या यंत्रणेतंर्गत अनागोंदी कारभारावर परखड शब्दांत विभागप्रमुखांची अक्षरक्षः खरडमपट्टी काढली. या बैठकीतून वारंवार लागू केल्या जाणा-या संचारबंदीबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले. रुग्ण आढळल्या बरोबर संचारबंदी लागू करण चुकीचं आहे, असे स्पष्ट करीत एकदाच दिर्घ संचारबंदी लावा. चार दिवस आधी नागरिकांना कळवा.संचारबंदी सुध्दा लागू करते वेळी कठोर भूमिका घ्या,असा सल्ला दिला.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.



No comments:

Post a Comment