Friday, August 14, 2020

आठवण स्व. विमलताईची येते पुन्हा, पुन्हा .15 ऑगस्ट विनम्र अभिवादन !

आठवण स्व. विमलताईची येते पुन्हा, पुन्हा .15 ऑगस्ट विनम्र अभिवादन !


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
समाजामध्ये आशी काही माणस जन्माला येवून जातात , कि त्यांनी केलेली समाजांची सेवा , गाजवलेले कृतत्व नजरे आड जात नाही . देह सोडून गेले तरी आशांच्या आठवणी कामातून अगदी जिवंत असतात ? त्यांनी लोकावर केलेले प्रेम ? कार्यकत्याचा केलेला संभाळ ?आपल्या भागाचा केलेला विकास , या सर्व पाऊलखुणा नजरेआड होत नाही ?पुण्य कर्माच संचित आठपणीची शिदोरी मागे ठेवते , मग जिवाभावाच्या लोकांना त्याचा त्रासपण होतो . असच एक नेत्रत्व ज्यांनी केज विधानसभा मतदार संघाच तब्बल 22 वर्ष नेत्रत्व केल , पण दुर्देवाने नियतीने हिरावून नेहल , ज्याच नाव , स्व . विमलताई नंदकिशोर मुंदडा . ज्यांची उदया 15 रोजी जयंती आहे . सात वर्ष त्याना जावून झाले तरी आजही अगदी घराघरात आनुयायांना आठवण येते पुन्हा पुन्हा ,,,,,,,,,,,,,,,,,,
            बीड जिल्ह्याच्या राजकारणात ज्यांचा एक काळ होता. त्या केज विधानसभा मतदार संघाच्या माजी लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री. श्रीमती विमलताई मुंदडा यांची उद्या जयंती आहे. विमलताई मुंदडा म्हटलं की ज्यांनी या मतदारसंघावर तब्बल बावीस वर्षे अधिराज्य गाजवलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अकरा वर्षे मंत्री म्हणून काम केलं. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं. आणि खऱ्या अर्थाने केज विधानसभा मतदार संघात विकासाची महा गंगा आणली. वेगवेगळे पैलू आणि आठवणी विमल ताईच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहेत. एक महिला नेतृत्व म्हणून बीड जिल्ह्यात सकारात्मक भूमिकेतून त्यांनी सर्वांना सोबत घेऊन पालकमंत्री म्हणून केलेलं कामही कमी नाही. खरंतर विमलताई मुंदडा या मतदारसंघात जास्त लोकप्रिय का होत्या? याचं संशोधन केल्यानंतर एक लक्षात येतं. की त्यांनी सामान्य माणसावर आणि कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम केलं.  भागात राजकारण करताना केवळ विकासाचा राजकारण हा त्यांचा अजिंठा होता. खरंतर सुरुवातीला भाजपा आणि नंतर राष्ट्रवादी त्यांचा राजकीय प्रवास वेगवेगळ्या पक्षात झाला. पण या मतदारसंघातील मायबाप जनतेने त्यांना कधीच बाजूला ठेवलं नाही.  त्यांनी केलेली काम . भौतिक सुविधा, सर्वांच्या डोळ्यासमोर आहेत .सर्वात जास्त म्हणजे जनसंपर्क त्यांचा फार मोठा होता .सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखा मध्ये धावून जाणं? ही त्यांच्या राजकारणाची खरी ओळख होती. समोर गरजू माणसाला  मदतीचा हात करणं, हा त्यांच्या राजकारणाचा मूळ पिंड होता. म्हणून या मतदारसंघात लोक त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचे. एक एक माणूस आणि कार्यकर्ता जोडून त्यांनी जनसंपर्काचा जाळं मतदारसंघात विणलेलं होतं .खरं म्हणजे त्यांच्या राजकारणाचा मुख्य आधार नंदकिशोर मुंदडा हे होते . त्यांचा शेवटच्या माणसापर्यंत जनसंपर्क आजही मोठा आहे. समाजसेवेचा नंदादीप विमलताईच्या नंतर या मतदारसंघात तेवत ठेवला. त्याचे श्रेय खऱ्या अर्थाने नंदुशेठ यांना आहे. ज्यामुळे राजकारणाचे समीकरणं बदलली ,आणि पुन्हा कालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून. विमल ताईच्या सुनबाई  सौ .नमिता ताई अक्षय मुंदडा आमदार झाल्या. यात माजी मंत्री सौ .पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची अहम भुमीका राहिली . खरं पाहिलं तर मुलांन आमदार व्हावं .त्याच काळात आईने स्वप्न पाहिलं होतं . या माध्यमातून ते पूर्ण झालं . स्व . विमलताईच  कर्तृत्व एवढ मोठ आहे . कि इतिहासाची पाने चाळली तर बरेच लक्षात येते . या मतदार संघात त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्रांती घडवून आणली .15 ऑगस्ट सुरू झालेली व्याख्यान माला, खऱ्या अर्थाने संस्कृतिक अंबाजोगाई शहरातील लोकांच्यासाठी मेजवानी असते.   व्याख्यानमाला आज कोरोना संकटामुळे बंद ठेवावी लागली. पण खर्‍या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ,व्याख्यानमाला चांगलीच गाजली हे मात्र नक्की.आज आईचा सक्षम वारसा डोळया समोर ठेवून युवा नेते अक्षय मुंदडाची यशस्वी वाटचाल सुरु आहे . या पार्श्वभूमीवर जयंतीच्या निमित्ताने विमल ताई ची आठवण आणि अनेक प्रसंग डोळ्या समोर येतात . अंबाजोगांई जिल्हा निर्मिती हे त्यांचे स्वप्न त्यासाठी खुप संघर्ष केला . उजळा देताना एक गोष्ट खरी आहे की, किमान पंधरा ते वीस वर्ष माझा त्यांच्याशी असलेला सहवास, आणि त्यांनी कौटुंबिक लावलेला जिवाळा .हा कधीच विसरू शकत नाही .  खरंतर वर्तमान काळात पूर्वीसारखे राजकारण राहिले नाही. जुन्या राजकारण्याची आठवण आजच्या पिढीला नेहमीच येते. जसं की भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी याच बीड जिल्ह्याच राजकारण तब्बल पंचवीस वर्षे एकतर्फी केलं. सकारात्मक दृष्टी ठेवून गरिबांची सेवा या लोकप्रतिनिधीच्या हातून नेहमीच झालेली आहे .तसंच विमलताई मुंदडा यांचं होतं . मानवता वादी भुमीका त्यांची होती . एक गोष्ट खरी तो म्हणजे ताईचा . चेहरा  डोळ्यासमोरुन जाता जात नाही . मृत्यू हे सत्य असतं, पण तो झाला तरी ,त्यांचं कर्तृत्व आणि संचित पुण्याई त्यामुळे असत्य वाटतो . हाच खऱ्या अर्थाने नीती चा खेळ म्हणावा . चांगली माणस देव जास्त काळ का ?ठेवत नाही हे कोडे अद्याप कळत नाही , सात वर्ष झाले ताईना जावून तरी विश्वास बसत नाही माता योगेश्वरी त्यांच्या आत्म्याला शांती देवो .ओम शांती ओम शांती ओम शांती.
                            
                        

         सुनबाईच्या रुपात पुन्हा ताई
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, 
  खरतर नियतीचा खेळ कसा असत बघा .विमल ताई यांचं दुर्दैवी निधन झाले.  त्यांच्यानंतर सुनबाई जणूकाही ताईच्या या अवतारात राजकीय क्षेत्रावर प्रगट झाल्या. अाज सौ . नमिता अक्षय मुंदडा आमदार म्हणून काम करताना ,हुबेहूब विमल ताईचा चेहरा लोकांना वाटतो? त्यांच्या अंगी असलेली नम्रता ,विनयशीलता, जनसंपर्क साठीचा संवाद. यातून मतदारसंघातील लोकांना ताईचा चेहरा दिसतो हे मात्र नक्की. 
          
राम कुलकर्णी 
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.




 

                         राम कुलकर्णी
                        मो.9422742577

No comments:

Post a Comment