मौजे खडका येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
सोनपेठ तालुक्यातील मौजे खडका येथे भा.ज.प. जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव माव्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
नियोजित अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या जागेत अण्णाभाऊ जो लाल बावटा खांद्यावर घेऊन आयुष्यभर लढले तो लाल बावटा फडकावून या कार्यक्रमास सुरुवात झाली.
कार्यक्रमात बोलताना शिवाजीराव मव्हाळे यांनी अण्णाभाऊंच्या आर्थिक विषमता विरोधी लढ्याची माहिती देऊन समाजाने त्यांचा हा लढा पुढे नेण्याचे आवाहन केले. अनेक दिवसांपासून मागणी होत असलेले अण्णा भाऊ साठे सभागृहास आज ग्राम पंचायतीने जागा दिली असून लवकरच या जागेवर सभागृह उभे करण्यासाठी सरवोत्परी प्रयत्न करण्याचे आश्वासन ही यावेळी त्यांनी दिले.
मौजे खाडका येथील नियोजित अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या जागेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमास पोलीस पाटील वैजनाथ यादव, मुरलीधर यादव, ज्ञानेश्वर मोरे, अभिमान मोरे, सुभाष मोरे, व इतर जण उपस्थित होते.




No comments:
Post a Comment