परळी / सोनपेठ (दर्शन) :-
परळी नगर परिषदेतील अग्नमीशामक दलाचे चालक तथा सामाजिक व धार्मीक क्षेत्रात अग्रेसर असलेले अनिल देवलिंग स्वामी कानडीकर यांचे रविवार दि.23 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
परळी न.प.च्या अग्नीशामक विभागात सुमारे वीस वर्षापासून ते कार्यरत होते.अत्यावस्थ रूग्णांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यासाठी ते स्वत:हुन पुढाकार घेत होते.सामाजिक व धार्मीक कार्यक्रमातही त्यांचा नेहमीच सहभाग होता.अनुष्ठान कार्यक्रमातही त्यांचा नेहमीच सक्रीय सहभाग असायचा. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही अत्यावश्यक सेवेचा एक घटक म्हणून अनेक रूग्णांना त्यांनी रूग्णालयात दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या पश्चात आई, वडिल, दोन बहीणी, पत्नी, मुलगा विक्रम व दोन मुली असा परिवार आहे. अत्यंत हसतमुख व अडचणीच्या वेळी स्वत:हुन मदतीचा हात पुढे करणारा चांगला मित्र गमावला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. स्वामी कुटूंबियावर कोसळलेल्या दु:खात समस्त विरशैव समाज बांधव, स्वामी सोनपेठकर व सा.सोनपेठ दर्शन परिवार सहभागी आहे.
No comments:
Post a Comment