Saturday, August 15, 2020

कर्ज वितरणाबाबत आठ दिवसांत निर्णय पालकमंत्री नवाब मलिक यांची माहिती

कर्ज वितरणाबाबत आठ दिवसांत निर्णय
पालकमंत्री नवाब मलिक यांची माहिती 



परभणी / सोनपेठ (दर्शन):-

जिल्ह्यातील शेतक-यांना पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट अग्रणी बँकेने ठरवून दिलेल्या उदिष्टाप्रमाणे पूर्ण होवू लागले असतांना स्टेट बँकेकडून होणा-या कर्ज वितरणात अडचणी निर्माण होवू लागल्या आहेत. याबाबत राज्य पातळीवरच येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली. 
पालकमंत्री मलिक यांनी जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाचा आढावा घेताना राष्ट्रीयकृत बँका त्यांच्या उदिष्टाप्रमाणे कर्जाचे वाटप करीत आहेत. हे प्रमाण निश्‍चीतच चांगले आहे. परंतू काही खासगी बँका व स्टेट बँकाकडून शेतक-यांना कर्ज वितरण होत नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबतचा आढावा घेण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले असून अन्य बँकाबाबत लवकरच निर्णय घेवून शेतक-यांना कर्ज वाटप केले जाईल, असेही श्री मलिक यांनी सांगितले.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.




 

No comments:

Post a Comment