सोनपेठ शहरात रामभक्तांनी केला मोठा जल्लोष श्रीराम प्रतिमेचे घरोघरी पूजन ; फटाक्यांची आतिषबाजी,श्रीराम नामाचा जयघोष
भगवान श्रीप्रभु रामचंद्र यांच्या अयोध्येच्या जन्मभूमीतील शिलान्यासाच्या सोहळ्या दरम्यान बुधवारी (दि.5) शहरासह तालुक्यात विविध पक्ष, संस्था, संघटनासह रामभक्तांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे तसेच पुर्णाकृती शिल्पाचे पूजन, भजन, किर्तन तसेच श्रीरामाचा जयघोष करीत फटक्यांची अतिषबाजी केली.अयोध्येतील शिलान्यासाचा सोहळा बुधवारी सकाळ पासून दुपारी उशिरा पर्यंत माध्यमांनी लाईव्ह दाखविला. रामभक्तांच्या दृष्टीने तो सोहळा भूत नो भविष्य ठरला. सकाळ पासूनच रामभक्त टी.व्ही. समोर ठाण मांडून होते. अयोध्येतील क्षणाक्षणाच्या घडाघोडी, उत्साह, जल्लोष टिपत होते. दुपारी 12 वाजून 44 मिनिटांचा शिलान्यासाचा सोहळा रामभक्तांनी याची देही याची डोळा अनुभवला अन् श्रीरामाचा एकच जयघोष केला.सोनपेठ शहरातील नवा मोंढा हनुमान मंदिर येथे भजन, श्री राम मंदिर वगैरे ठिकाणी सकाळ पासूनच भजन, किर्तन, श्रीरामाचा जप व अन्य कार्यक्रम मोजक्या रामभक्तांच्या उपस्थितीत सुरू होते. दुपारी शिलान्यासाच्या वेळी रामभक्तांचा जल्लोष अक्षरक्षः शिगेला पोचला. ठिकठिकाणी अनेकांनी आतीषबाजी केली तर काहींनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तर अनेकांनी भगव्या पताका ध्वजारोहन केले. पहाटेच माता भगिणींनी घरासमोर छानसी रांगोळी काढत, रांगोळीतुन श्रीरामांना वंदन केले. आयोध्येतील मंदिराच्या शिलान्यासाचा आनंद अगदी सर्वांतून ओसंडून वाहत असल्याचे दिसत होते. त्यामुळेच अनेकांनी घरावर गुढीही उभारली होती.सा.सोनपेठ दर्शन प्रतिनीधी पाहनी केली असता. रामभक्तांनी आपल्या घरावर भगवे ध्वज फडकवत श्रीरामांना एकप्रकारे वंदनच केले.भगवान श्री प्रभुरामचंद्र यांच्या आयोध्येतील भव्य राममंदिराच्या भूमीपुजन सोहळ्यानिमित्ताने शहरासह तालुक्यात रामभक्तांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरीच भजन, कीर्तन, रामरक्षा, तसेच गुढी, भगवे झेंडे उभारून, सायंकाळी दीपोत्सव व्यापारी व घरोघरी साजरा करीत आनंदोत्सव साजरा करावा,असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले होते. या आवाहनास नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला असेच दिसत आहे.


No comments:
Post a Comment