Saturday, August 1, 2020

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा पथविक्रेता (हात गाडी वाले) यांनी कर्ज योजनेचा लाभ घ्यावा - उपनगराध्यक्ष दत्‍तराव कदम

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा पथविक्रेता (हात गाडी वाले) यांनी कर्ज योजनेचा लाभ घ्यावा - उपनगराध्यक्ष दत्‍तराव कदम 


सोनपेठ  (दर्शन) :-
 
सोनपेठ नगर परिषद येथे प्रधानमंत्री स्वनिधी योजना महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई द्वारे नगर पथविक्रेते (हात गाडी वाले) अनौपचारिकरीत्या नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नगरवासीयांच्या आर्थिक कुवती प्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. (covid-19) साथीचा रोग सर्वत्र पसरलेला असल्यामुळे परिणामी टाळेबंदीमध्ये (लाँकडाउन) पथविक्रेत्यांच्या (हातगाड्या वाल्यांच्या) उपजीविकेवर विपरित परिणाम झालेला आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांच्या (हात गाडी वाल्यांच्या) व्यवसायास खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता (हातगाड्या वाले)आत्मनिर्भर निधी पथविक्रेत्यांसाठी (हात गाडी वाले)  विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 लाभार्थीची पात्रता नियम- 
१) दिनांक 24 मार्च 2020 रोजी व त्यापूर्वीचे पथविक्रेते (हात गाडी वाले). 
२) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रधान केलेले विक्री प्रमाणपत्र/ओळखपत्र असलेले पथविक्रेते (हात गाडी वाले).
३) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळले परंतु त्यांना विक्री प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र दिले गेले नाही असे पथविक्रेता  (हात गाडी वाले).
४) सर्वेक्षणात वगळलेले किंवा सर्वेक्षण पूर्ण झाल्यास विक्री सुरू केली आहे. आणि त्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारस पत्र जारी केलेले आहे.
 ५) ग्रामीण भागातील पथविक्रेता (हात गाडी वाले) जे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भौगोलिक क्षेत्रा मध्ये पथविक्री (हात गाडी) चालवतात त्यास नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारस प्रमाणपत्र जारी केलेली आहे.

 योजनेचे उद्दिष्ट -
१) पथविक्रेता (हात गाडी वाले) यांना सहाय्य म्हणून खेळते भांडवल १०,०००/-  दहा हजार रुपये कर्ज स्वरुपात उपलब्ध करून देणे. 
२) नियमित परतफेड करणाऱ्यास प्रोत्साहन देणे. 3) डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे.

लाभाचा तपशील
 १) नागरी पथविक्रेता (हात गाडी वाले) एक वर्षाच्या परतफेड मुदती सह रु.१०,०००/- रुपये दहा हजार पर्यंतचे भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील.
२) सदर कर्जावर बँकेच्या प्रचलित दराप्रमाणे व्याज दर लागू राहतील.
३) विहीत कालावधीमध्ये कर्ज परतफेड केल्यास ७ % व्याज अनुदान मिळण्यास लाभार्थी पात्र राहील.

आवश्यक कागदपत्र 
१) आधारकार्ड. २) रेशनकार्ड. ३) मतदान कार्ड. ४) डोमेसाईल प्रमाणपत्र.५) बँक पासबुक. 6) पॅन कार्ड. ७) ड्रायव्हिंग लायसन (असल्यास). ८) बाजार वसुली पावती. ९) आधार लिंक मोबाईल नंबर व १०) पासपोर्ट फोटो.

 पथविक्रेता (हात गाडी वाले) कर्ज अर्ज पद्धत:-

http:/pmsvanidhi.mohua.gov.in 
या लिंक वर सेतू केंद्र यांच्या द्वारे अर्ज करू शकतात. 
आधारकार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक.

विशेष सूचना :- कोव्हिड १९ (साथीचा रोगा) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विनाकारण कोणी घराबाहेर जाऊ नये व कोणीही प्रत्यक्ष नगर परिषद कार्यालयांमध्ये न येता खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा ७३९७८२३१०० व ८००७९३१२९८ असे आवाहन उपनगराध्यक्ष दत्‍तराव कदम यांनी साप्ताहिक सोनपेठ दर्शन प्रतिनीधीशी बोलताना केले आहे.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.


              
                         

No comments:

Post a Comment