Saturday, August 1, 2020

राजीव गांधी महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी...

राजीव गांधी महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी...



सोनपेठ (दर्शन) : -

                       आर्थिक विषमता विरोधी आंदोलन तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शाहीर महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आज राजीव गांधी महाविद्यालय सोनपेठ येथे साजरी करण्यात आली.
                     यावेळी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन कै.राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रतीमेस अभिवादन करून हा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला.
                       कोरोणा सांसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून संपन्न झालेल्या या कार्यक्रमास राजीव गांधी महाविद्याल याचे प्राचार्य बालाजी शिंदे, प्रा.चंद्रशेखर किरवले, प्रा. पंडीत राठोड, गोपाळ लोंढे आदी जण उपस्थित होते.
 
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.


              
                         

No comments:

Post a Comment