Monday, August 10, 2020

विभागीय आयुक्त केंद्रेकर उद्या दि.11 आँगस्ट पासून परभणीत

विभागीय आयुक्त केंद्रेकर उद्या दि.11 आँगस्ट पासून परभणीत

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतरसुध्दा जिल्हा शासकीय रुग्णालयातंर्गत अनागोंदी कारभारात काडीमात्र सुध्दा सुधारणा न झाल्याने विभागीय महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकर हे मंगळवारी(दि.11) परभणीच्या दौ-यावर दाखल होणार आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातंर्गत अनागोंदीची गंभीर दखल घेतली असून त्यासाठी तेे स्वतःपरभणीचा दौ-यावर येणार असल्याची माहिती खा.जाधव यांनी दिली.
खा.जाधव यांनी शुक्रवार पाठोपाठ सोमवारी सुध्दा विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यातून शहरासह जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकाबद्दल तपशीलवार माहिती दिली.विशेषतः या आपत्तकालीन स्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयातंर्गत संपूर्ण कामकाजच पूर्णतः कोलमडल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांची तातडीने उचलबांगडी करा, अशी मागणीही केली. जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना तसेच क्वारंटाईन केलेल्या संशयितांना दररोज कटू अनुभव येत आहेत. वैद्यकीय अधिका-यांसह कर्मचारी सेवेत अभुतपुर्व दिरंगाई करीत आहेत. स्वॅब घेण्यापासून औषधोपचारातील दिरंगाई अक्षम्य ठरत असून त्यामुळेच कोरोनाबाधित व्यक्तींच्या असंख्य तक्रारी समोर येवू लागल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात रुग्णालयातंर्गत एक-एक किस्से हे गंभीर स्वरूपाचे ठरले असून अलीकडे कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाणसुध्दा मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे खा.जाधव यांनी आयुक्त केंद्रेकर यांच्या निदर्शनास आणून दिले.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment