Sunday, August 9, 2020

कोरोनाचा उद्रेकः आजही 53 व्यक्ती बाधित, दोन व्यक्तींचा मृत्यू

कोरोनाचा उद्रेकः  आजही 53 व्यक्ती बाधित, दोन व्यक्तींचा मृत्यू 


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पसरला असून रविवारी(दि.9) शहरात 46 व जिल्ह्याभरात एकूण 53 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. तसेच नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात परभणीतील साखला प्लॉट येथील 45 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. तर गंगाखेड शहरातील ममता कॉलनीतील 55 वर्षीय महिलेचा गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. 
दरम्यान, कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी रविवारी दुपारीच काढलेल्या आदेशाद्वारे परभणी महानगरपालिका हद्द व पाच किमीच्या परिसरात दि.14 ऑगस्ट मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. पाठोपाठ सोनपेठ शहरात सुध्दा गेल्या दोन दिवसांत बाधित व्यक्तींची संख्या व क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या ओळखून 
दि.12 ऑगस्ट मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

No comments:

Post a Comment