धनगर साम्राज्य सेनेचे शुक्रवार पासून "सेल्फी वुईथ मेढपांळ" अभियान - प्रीतम देवकते
सोनपेठ (दर्शन) :-
धनगर समाजाच्या विविध प्रश्नासह मेंढपाळावरिल हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्रभर काम करत असलेल्या धनगर साम्राज्य सेनेकडून शुक्रवारपासून (7 ऑगस्ट) महाराष्ट्रभर "सेल्फी वुईथ मेंढपाळ" हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती धनगर साम्राज्य सेनेचे सोनपेठ तालुकाध्यक्ष प्रीतम देवकते यांनी दिली.
कोरोना आणि पावसाळा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवावर ठिकाणी हल्ले होत आहेत. मेंढ्या चारण्याच्या कारणावरून प्रस्थापित लोकांकडून मेंढपाळांच्या मेंढ्यांचे पिल्ले ओढून नेणे, धमकावणे, त्यांच्या महिलांना शिवीगाळ करणे आधी प्रकार होत आहे. काही ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून मेंढपाळावर शासकीय कामात अडथळा केल्याचे खोटे गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्रातील मेंढपाळ समाज हा गोंधळलेल्या व भयभित झालेल्या अवस्थेत आहे. कोरोना संकटाच्या काळात एक तर कोणी जवळ येऊ द्यायला तयार नाही आणि त्यात या अडचणी मुळे मेंढीपालन व्यवसाय संकटात आला आहे. यामुळे एकटा पडलेल्या या मेंढपाळाचा धीर देण्यासाठी शुक्रवारपासून 'सेल्फी वुईथ मेढपाळ' हे अभियान सुरू करण्यात येत आहे. शुक्रवारपासून (7 ऑगस्ट) सुरु होणारे अभियान सात दिवस चालणार असून अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी 13 ऑगस्ट रोजी याची सांगता होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून धनगर सासाम्राज्य सेनेचे पदाधिकारी आपापल्या भागातील मेंढपाळांच्या भेटी घेऊन त्यांच्या सोबत सेल्फी काढत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. एकूणच यामुळे मेंढपाळांत समाज आपल्या पाठीमागे असल्याची भावना वाढीस लागणार आहे. सेल्फी काढून जमा केलेले हे फोटो मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे पाठवण्यात येणार आहेत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी धनगर साम्राज्य सेना चे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हारकळ, युवा प्रदेशाध्यक्ष आशुतोष शेंडगे पाटील , विदर्भ प्रदेश प्रमुख श्रीकांत भुजाडे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख राहुल धनगर, विद्यार्थी आघाडीचे राम भंडारे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.



No comments:
Post a Comment