सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळला भगरीतुन ३० जणांना विषबाधा
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ येथील 30 व्यक्तींना भगरीतुन विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी घडलीे.या सर्व सगळ्या रुग्णांवर उपचार सुरु असुन सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे.
सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ या गावी कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने उपवासासाठी ग्रामस्थांनी गावातील दुकानातुन भगरीचे पीठ आणुन त्याच्या भाकरी करुन खाल्या.या भगरीच्या भाकऱ्या खाल्यानंतर अनेकांना उलट्या मळमळ होऊ लागल्याने गावातील ग्रामस्थांनी मिळेल त्या वाहनाने सोनपेठ येथील डिघोळ रोड स्थीत डॉ. चव्हाण यांच्या सोनपेठ हॉस्पिटल मध्ये धाव घेतली.डॉ.चव्हाण यांनी तातडीने सर्व रुग्णांची पहाणी करुन त्यांच्यावर औषधोपचार केले. सोनपेठ येथे तेवीस रुग्णांना दाखल करण्यात आले होते.सर्व रुग्नांना औषधोपचार करुन घरी पाठले.तर काहीजनांनवर उपचार सुरु आहेत.ईतर सात जणांनी गावातच उपचार घेतल्याची माहिती ग्रामस्तांनी दिली.


No comments:
Post a Comment