Monday, August 3, 2020

सोनपेठ तालुक्यात 02 आँगस्टपर्यंत 1 लाख 50 हजार 387 क्विंटल कापसाची खरेदी

सोनपेठ तालुक्यात 02 आँगस्टपर्यंत 1 लाख 50 हजार 387 क्विंटल कापसाची खरेदी 



सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ तालुक्यातील पणन महासंघ व भारतीय कपास निगम या दोन्ही च्या वतीने तालुक्यात कापसाची खरेदी करण्यात आली. कापूस खरेदीसाठी तालुक्यात राजेश्वर व मीनाक्षी जिनिंग येथे सीसीआयची खरेदी केंद्र होते तर करम येथील सालासर जमिनीमध्ये पणन महासंघाची खरेदी केंद्र आहेत तालुक्यात कापूस खरेदी सुरू झाल्यापासून 02 आँगस्टपर्यंत 1 लाख 50 हजार 387 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. 
             कोरोना विषाणू देशात शिरकाव केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मार्चमध्ये शासनाने लोक डाऊन करण्याचा निर्णय घेतला या परिस्थितीमध्ये केवळ वैद्यकीय सेवांना परवानगी देत सर्व व्यवहार थांबविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे तालुक्यातील सर्व व्यवहार थांबले गेले या परिस्थितीमध्ये कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून राहिला कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कापूस खरेदी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तालुक्यात 20 एप्रिल पासून कापूस खरेदीस सुरूवात झाली. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन नोंदणी केलेल्या तालुक्यातील 2355 शेतकऱ्यांचा तब्बल 70 हजार 209 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. यामध्ये करम येथील सालासर जिनिंग मध्ये 1992 शेतकऱ्यांचा 59 हजार 720 क्विंटल तर शहरातील राजेश्वर व मीनाक्षी मध्ये 363 शेतकऱ्यांचा 10 हजार 489 क्विंटल असा एकूण 2355 शेतकऱ्यांचा 70 हजार 209 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आला आहे. तर कोरोनाच्या पुर्वी पणन च्या सालासर जिनिंगमध्ये 1700 शेतकऱ्यांचा 53754 क्विंटल व सिसिआयच्या मिनाक्षी व राजेश्वर जिनिंगमध्ये 26424 कापसाची खारेदी करण्यात आली होती. कोरोना पुर्वी व नंतर असा एकूण 5138 शेतकऱ्यांचा 1 लाख 50 हजार 387 क्विंटल  कापसाची खरेदी करण्यात आली.

मा.जि.प.अध्यक्ष तथा कृ.उ.बा.स.सभापती
राजेशदादा विटेकर यांचे अवाहन...

सोनपेठ तालुक्यात चालू असलेले कापूस खरेदी केंद्र पाच ऑगस्ट पासून बंद होणार असून,आनलाईन नोंदणी केलेल्या परंतु फोन न आलेल्या शेतकऱ्याकडे कापूस शिल्लक असेल तर आशा शेतकऱ्यांनी चार ऑगस्ट पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा मा.जि.प.अध्यक्ष  राजेशदादा विटेकर यांनी केले आहे....


No comments:

Post a Comment