संघ, वि. ही. प, बजरंग दल,अन्य सर्व संस्था प्रत्येक कार्यकर्त्याला मनापासून “कड़क” सलोट....... - संदीप जाधव
कोविड बाधित मृत व्यक्तिच्या अंत्यविधी समयी अनुभवलेला एक भावनिक प्रसंग ....
पिंपरी गावातील आयुश्री हॉस्पिटल मध्ये एक श्री पाटनकर काक़ांच्या तब्येतीविषयी चौकशी करण्याची विनंती पुणे महानगर सहकार्यवाह यानी केली होती,तब्येत नाज़ुक होती आणी दुर्दैवाने या काक़ांचे संध्याकाळी उशिरा निधन झाले..
या काक़ांचे कुणीही नातेवाईक पुण्यात न्हवते, मृत्युची बातमी रात्री ९ च्या सुमारास समजली. नातेवाईक उपलब्ध नसल्याने पिंपरी चिंचवड़ च्या आम्ही क़ार्यकर्त्यानी हा अंत्यविधी करण्याचे स्वीकारले,उशिर ख़ूप झाला होता, सर्व कार्यकर्ते दिवसभराचे अंत्यविधी संपवून घरी गेले होते,मी ग्रूप वर मेसेज सोडला आणी काही क्षणात कुणाल च्या नेतृत्वात ८-१० जनाची टिम तयार झाली,(नित्य सिद्ध शक्ती ती हिच) स्मशान पास काढ़ने, ambulance व्यवस्था, हार, शाल, फुले अन्य पूजा साहित्य जमवाजमवी सुरु झाली,आपला रक्ताचा नातेवाईक गेला आहे या भावनेने स्वयंसेवक काम करत होते, सर्व खबरदारी घेत रात्री १२ च्या सुमारास कै. मोहनकाका पाटनकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. अंत्यसंस्कार करणा-या स्वयंसेवकांचा भावनिक कस तेव्हा लागला ज़ेव्हा या काकांच्या मुंबई, दिल्ली येथील नातेवाईक़ांना video call द्वारे अंत्यदर्शन केले गेले........
या काक़ांच्या मुलीने अंत्यसंस्कारा करिता झालेला खर्च online पाठवते अशी विनंती केली, परंतु स्वयंसेवक़ानी हे आमचे घरचे दुःखद कार्य आहे, याचे कसले पैसे? या भावनेने विनम्र पणे नकार क़ळविला.
मित्रानो हे लिहीन्याच कारण आज महीना होत आला आम्ही सर्व स्वयंसेवक वेगवेगळया कामात आहोत, कुणी स्क्रीनिंग, antigen टेस्ट, कुणी काढ़ावाटप, कुणी अंत्यविधी, कुणी जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी च्या कामात आहे, आज पर्यंत ४० अंत्यविधी विधीवत केले गेलेत...काम ख़ूप जोमाने आणी श्रधेने सुरु आहे.
पण......
या सर्व सेवाकार्यात काही दुर्घटना सुद्धा होत आहेत, प्रमुख कार्यकर्ते स्वतः कोरोना positive झाले आहेत. तरीही युद्धात सैनिक जख्मी होनारच,अस झाले तरी बाकीचे सैन्य किल्ला लढवतच राहतात, तसेच हे काम अव्याहत सुरु आहे व राहिल...
कुठलिही प्रसिद्धी, कूठलिही अन्य अपेक्षा न बाळगता हे माझे समाज़ाप्रती स्वाभाविक दायित्व आहे या भावनेने,स्वतःच्या जिवावर उदार होवुन काम करणा-या माझ्या या स्वयंसेवक बंधुना “कड़क” सलोट.......























