स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस थेट संपर्काद्वारे स्वॅबचा रिपोर्ट लवकर द्या :- जिल्हाधिकारी
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संशयितांच्या स्वॅबच्या अहवालास होणारा विलंब चिंताजनक आहे. आपल्या प्रयोगशाळे मार्फत तातडीने स्वॅबची रिपोर्ट मिळावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस थेट संपर्काद्वारे केली.
शासकीय रुग्णालयात मोठया प्रमाणावर संशयित दाखल होत आहे. वैद्यकीय अधिका-यांमार्फत या संशयितांच्या वैद्यकीय तपासणीसह स्वॅबचे अहवाल घेतले जात असून ते अहवाल तातडीने नांदेड येथील प्रयोगशाळकडे पाठविले जात असून स्बॅवच्या अहवालास मात्र विलंब होत आहे. चार-चार दिवस स्वॅबचे अहवाल प्राप्त होत नसून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री मुगळीकर यांनी रविवारी(दि.31) त्या प्रयोगशाळेतील संबंधीत अधिका-यांशी संपर्क साधला अन् होणा-या विलंबा बाबत माहिती घेतली. चर्चा केली. त्याद्वारे स्वॅबचे रिपोर्ट तातडीने मिळावेत, अन्यथा त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी उद्भवत असल्याचे नमुद केले.
दरम्यान, जिल्हाधिका-यांच्या या हस्तक्षेपामुळे अहवाल लवकरात लवकर प्राप्त होतील,अशी आशा पल्लवीत होत आहे.

No comments:
Post a Comment