महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन परभणी जिल्हाधिकारी यांना सादर
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना परभणी शाखेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन आज दि 11 मे रोजी परभणीचे जिल्हाधिकारी दि एम मुगळीकर यांना देण्यात आले.
मनसे परभणी शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात प्रामुख्याने जिल्ह्यातील छोटे मोठे व्यापारी कारागीर व्यावसायिक यांचे लॉक डाउन कालावधीत दुकान भाडे व घरभाडे त्यांच्या मालकांनी माफ करावे.
परगावातून अथवा परराज्यातून आलेल्या नागरिकांची कोवीड 19 ची चाचणी करूनच त्यांना घरी पाठवावे
बॉण्ड पेपर विक्रीस परवानगी देण्यात यावी
परभणीत अवैध वाळू वाहतुक व उपसा याबाबत प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी सदरील निवेदनात करण्यात आली आहे
निवेदनावर मनसे चे जिल्हासंघटक श्रीनिवास लाहोटी व मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक यांच्या स्वाक्षरी आहेत.

No comments:
Post a Comment