Thursday, May 28, 2020

जिल्हा शल्य चिकित्सकांनाच पदमुक्त करा भाजपच्या परभणी महानगर शाखेतर्फे निवेदन

जिल्हा शल्य चिकित्सकांनाच पदमुक्त करा
भाजपच्या परभणी महानगर शाखेतर्फे निवेदन



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विरुध्दच्या लढाईत गलथान कारभाराबद्दल येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना पदमुक्त करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली.
महानगर शाखेचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, मोहन कुलकर्णी, संजय शेळके, प्रशांत सांगळे, मोकींद खिल्लारे, सौ. मंगल मुदगलकर, मधुकर गव्हाणे, विजय दराडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व महापालिका सदस्यांनी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांची गुरुवारी भेट घेतली. त्यातून एक निवेदन सादर करीत जिल्हा शासकीय रुग्णालया अंतर्गत अनागोंदी कारभारावर जोरदार टिका केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागरगोजे यांच्या तीव्र उदासिनतेमुळे,गलथान कारभारामुळे रुग्णालया अंतर्गत सोयी-सुविधा पुर्णतः कोलमडल्या आहेत. विशेषतः या आपत्तीच्या काळात विलगिकरण कक्ष आणि कोरोनाबाधित रुग्णांकडे पूर्णतः दुर्लक्ष सुरु आहे. संशयित आणि बाधित व्यक्तींना एकच स्वच्छतागृह उपलब्ध केल्या गेले असून त्याद्वारे संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. भोजनासह निवासाचीही कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. सरकारद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असतांना सोयी-सुविधा आणि तांत्रिक बाबींकडे शल्य चिकित्सकांनी हेतुतः दुर्लक्ष सुरु केले असून निधीची पध्दतशीरपणे विल्हेवाट कशी लावायची ? यावरच लक्ष केंद्रित केले असल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला. डॉ. नागरगोजे यांच्या अनागोंदी कारभाराने जिल्हा शासकीय रुग्णालयास सील ठोकण्याची वेळ आली आहे, असे या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले.



संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752. 

No comments:

Post a Comment