Wednesday, May 20, 2020

सोनपेठ तालुका व शेळगाव येथिल नागरीकांनी घाबरून जाऊ नका, जागरूक रहा - राजेश विटेकर

सोनपेठ तालुका व शेळगाव येथिल नागरीकांनी  घाबरून जाऊ नका, जागरूक रहा - राजेश विटेकर



सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील कोरोना पोसिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात असलेले ६ जण पोसिटीव्ह आल्याने सोनपेठ तालुक्याचे संकट वाढले आहे तसेच दि.20 मे 2020 बुधवार रोजी जिल्ह्यात एकूण ९ रुग्णांची संख्या वाढल्याने परभणी जिल्हा रेड झोन मध्ये गेला आहे.
कोरोनाच्या या युद्धात आपल्या जिल्ह्याने व तालुक्यांने चांगली खिंड लढवली होती मात्र सद्यस्थितीत आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. कोरोना वायरसचा प्रादुर्भाव दुदैवानं वाढतोय, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी सर्वांनी काळजी घ्या, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य कराव. कोरोनाविषयी जनजागृती करा, घरातल्या लहानग्यांची व जेष्ठांची विशेष काळजी घ्या आणि घराच्या बाहेर पडू नका ही विनंती.


No comments:

Post a Comment