'राज्यस्तरीय श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च परिक्षा मध्ये 'जि.प.प्रा.शाळा,वाघलगाव ची'कु.माधुरी ताल्डे' ही विद्यार्थिनी राज्यस्तरीय यादीत दुसर्या रँकवर
सोनपेठ (दर्शन) :-
'राज्यस्तरीय IAS श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च परिक्षा' २०२० या परिक्षेचे स्वरूप नवोदय विद्यालयाप्रमाणेच असते. यात भाषा, गणित, बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर आधारित ८० प्रश्न १०० गुणांसाठी दिलेले असतात. यामध्ये 'जि.प.प्रा.शा.वाघलगाव ता.सोनपेठ जि.परभणी' शाळेतील इ.५वी तील विद्यार्थीनी 'कु.माधुरी शिवाजी ताल्डे' ही विद्यार्थिनी ५ जानेवारी २०२० रोजी परभणी येथे घेण्यात आलेल्या ,'राज्यस्तरीय IAS श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च परिक्षा २०२०' मध्ये ९८.७५ % गुण मिळवून राज्यात दुसर्या रँकमध्ये आल्याने, तीचे जि.प.अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर, जि.प.सदस्य, प.स.सभापती सौ.मिराताई जाधव, प.स.सदस्य व सदस्या, गट विकास आधिकारी, गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, वर्गशिक्षक जाधव पी.बी., शाळेचे मुख्याध्यापक नागरगोजे आर.पी., सा.सोनपेठ दर्शन परीवार व कुटूंब, नातेवाईक आदिंच्या वतीने कौतुक केले जात आहे.पुढिल वाटचालीस सर्वस्तरातुन शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

No comments:
Post a Comment