सोनपेठ (दर्शन) :-
भारत देशात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सभोवतालची परिस्थिती अत्यंत गंभीर होत आहे देशातील तसेच महाराष्ट्रातील शासन या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्नशील आहेच अशा परिस्थितीत तमाम मुस्लिम बांधवांनी या पवित्र रमजान महिन्यात सकल मानव कल्याणासाठी प्रार्थना करणे तसेच रमजान ईद सणा निमित्त होणारा खर्च आपापल्या परिस्थिती नुसार गोरगरीब गरजवंत बांधवांना तो कोणत्याही जातीचा असो मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याला व त्याच्या कुटुंबीयांना मदत करून तमाम मुस्लिम बांधवांनी ही 2020 ची रमजान ईद साजरी करावी आणि या कोरोनाला हरवण्याच्या लढाईत आपला ही सक्रिय सहभाग असल्याचे दाखवून द्यावे, शक्यतो मदत केल्याचे फोटो / व्हिडिओ न काढता मदत करावी, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून मदत करावी असे आवाहन इखरा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी साप्ताहिक सोनपेठ दर्शनशी बोलताना आपले मत व्यक्त केले तसेच अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे, सुरक्षित अंतर बाळगावे, बाजारात गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment