Monday, May 25, 2020

धोका झाला कमी ? केव्हिड 19 संसर्गाच्या 11 दिवसानंतर पॉझिटिव्ह रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होणार नाही.....

धोका झाला कमी ? केव्हिड 19 संसर्गाच्या 11 दिवसानंतर पॉझिटिव्ह रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होणार नाही.....


सोमवार,  25  मे  2020

नवी दिल्ली / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असताना, या विषाणूची लक्षणंही बदलताना दिसत आहेत. दरम्यान आता सिंगापूरच्या तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कोव्हिड-19 रूग्ण 11 दिवसानंतर संसर्गजन्य नसतात, असे समोर आले आहेत. बहुतेक रूग्णांकडून संसर्ग होण्याचा धोका नगण्य आहे. सिंगापूरच्या नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्टीव्ह डिसीज अॅण्ड अ‍ॅकेडमी ऑफ मेडिसिन (Singapore’s National Centre for Infectious Diseases and the Academy of Medicine) यांनी संयुक्त संशोधनात असा दावा केला आहे.

संशोधकांनी रुग्णालयात दाखल केलेल्या 73 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमधून संक्रमणाचा धोका किती आहे, याचा अभ्यास केला. यात असे दिसून आले की लक्षणं उद्भवल्यानंतर सात दिवसांपर्यंत, व्हायरसची संख्या वाढण्याची आणि हवेत पसरण्याची शक्यता असते. मात्र आठव्या आणि दहाव्या दिवसात कमकुवत होतो आणि 11व्या दिवसापर्यंत हा धोका कमी होतो.

दरम्यान, सिंगापूरमध्ये सध्या 24 तासांच्या आता रुग्णांची दोन स्वॅब टेस्ट केली जाते. दोन्हीही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याचा नियम आहे. दरम्यान, NCIDच्या तज्ज्ञांच्या मते, स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्यास त्याचा अर्थ असा नाही की तो रुग्ण या व्हायरसचा वाहक आहे.

याबाबत संशोधन करणारे भारतीय डॉक्टर अशोक कुरुप यांचे म्हणणे आहे की, या संशोधनाचा निकाल खूप अचूक आहेत. गंभीर आजारी रूग्णांवर दीर्घकाळ उपचार करावे लागतात. म्हणूनच, त्यांना 11 दिवसानंतरही डिस्चार्ज देणं योग्य नाही, कारण जरी ते इतरांना संसर्ग पसरवत नसले तरी त्यांच्या स्वतःच्या जीवाला धोका असू शकतो. जर्मनमधील संशोधनातही हेच म्हणणे आहे. जर्मनीत कोरोनाने संक्रमित झालेल्या नऊ रुग्णांवर केलेल्या संशोधनात असेच परिणाम दिसून आले आहेत. संक्रमण झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच रुग्णाच्या घशात आणि फुफ्फुसात व्हायरसची संख्या झपाट्याने वाढताना दिसली.

दरम्यान, NCIDचे संचालक लिओ यी म्हणतात की संसर्गाची लक्षणे उद्भवल्यानंतर 11 दिवसांनंतर रुग्ण इतरांकरिता धोकादायक नसल्याचे संशोधनात म्हटले आहे. अशा परिस्थितीत, गृह मंत्रालय रुग्णालयातून संक्रमित व्यक्तीस डिस्चार्ज देण्याचे नियम बदलू शकतात.

No comments:

Post a Comment