आयुक्तांच्या खरडमपट्टीनंतर 56 लाखाची तरतुद कोरोना उपाययोजनाः आरोग्य खात्यास त्यातून साहित्य
परभणी / सोनपेठ (दर्शन ) :-
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांंचा विभागीय महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शनिवारीच्या आपल्या दौ-यातून समाचार घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने साहित्य खरेदीस 56 लाख रुपयाची तरतुद उपलब्ध केल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
शासकीय रुग्णालयासह आयटीआयच्या नवीन इमारतीतील कोरोना हेल्थ सेंटरला विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी शनिवारी (दि.23) भेट दिली. तेव्हा तेथील उपाययोजनासह सोईसुविधांबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आरोग्य विभागाच्या अधिका-यांची अक्षरक्षः खरडमपट्टी काढली. विशेषतः ऑक्सीजन सेंटर किट्स उपलब्ध नसल्याबद्दल कठोर शब्दांत ताशेरे ओढले.सा.सोनपेठ दर्शननी त्याबाबत तपशीलवार असे वृत्त शनिवारी प्रकाशित केले होते. तेव्हा आरोग्य विभागांसह जिल्हा प्रशासन ख़डबडून जागे झाले. पाठोपाठ या दोन्ही ठिकाणी सेंटर ऑक्सीजन किट्स बसविण्या अन्य साहित्य खरेदीकरिता जिल्हा प्रशासनाने 56 लाख रुपयांची तरतूद उपलब्ध केल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
सद्यस्थितीत शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित व संशयीत रुग्णांकरिता 100 बेड्स, जवळपास 70 बेड्सला ऑक्सीजन किट्स व 22 व्हेटीलेटर्स उपलब्ध आहेत. आयटीआयतील हेल्थ केअर सेंटरमध्ये सुध्दा 200 बेड्स उपलब्ध करण्यात आले असून त्याठिकाणी सेंटरर्स ऑक्सीजन किट्स उपलब्ध नाहीत. व्हेटीलेटर्स सुध्दा नाहीत. या सेंटरमध्ये सद्यस्थितीत ओपीडी व संशयित रुग्णांकरिता कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे.
40 जम्बो किट्स दाखल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात 40 जम्बो ऑक्सीजन किट्स(नळकांड्या) आरोग्य विभागामार्फत उपलब्ध झाल्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयाने सुध्दा जवळपास 500 बेड्स खरेदी केले आहेत. आरोग्य विभागामार्फत डिजीटल थर्मामिटर सुध्दा उपलब्ध झाले आहे, अशी माहिती शासकीय सूत्रांनी सा.सोनपेठ दर्शनशी बोलतांना दिली.
No comments:
Post a Comment