कोरोनाबाधित चौघांची प्रकृती स्थिर ;
1359 पैकी 1274 जणांचे स्वॅब निगेटीव्ह, रविवारी रुग्णालयात 52 संशयित दाखल, एकूण 1369 संशयितांची नोंद
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जिल्हा शासकीय रुग्णालयात मुंबईहून परतलेल्या 50 वर्षीय महिलेसह जिंतुर तालुक्यातील शेवडी येथील एकाच कुटुंबातील तीन असे एकूण चौघां कोरोनाबाधित रुग्णंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर रविवार (दि.17) येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 52 संशयित दाखल झाले असून त्यामुळे संशयितांची संख्या 1369 पर्यंत पोचली आहे.1359 पैकी 1274 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.58 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. तपासणीस आवश्यक नसलेले एकूण स्वॅबची संख्या 22 एवढी आहे. रविवारी 52 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, एकूण 1369 संशयितांची नोंद झाली असून विलगिकरण कक्षात 336, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 64 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 969 जण आहेत. रविवारी एकूण 105 जणांचे स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले त्यात कारेगाव रस्त्यावरील मिलिंद नगरात मुंबईहून परतलेल्या 50 वर्षीय महिलेचा स्वॅब कोरोना पॉझीटीव्ह आला. त्या महिलेस रुग्णालयात निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत एकूण पॉझीटीव्ह अहवाल चौघांची प्रकृती स्थिर आहे.
No comments:
Post a Comment