परभणी जिल्ह्यात आता 172 अहवालाची प्रतिक्षा बुधवारी 49 जण दाखल ; संशयितांची संख्या 2020
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात बुधवारी (दि.27) सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 49 संशयीत दाखल झाले असून संशयितांची संख्या 2020 पर्यंत पोचली आहे. 172 संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आहेत.
एकूण 2063 पैकी 1738 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 67 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर 61 संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. 25 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण 172 स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातून बुधवारी एकूण 49 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री एकूण 91 जणांचे स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले. तर 31 जणांचे पॉझीटीव्ह आले. जिल्हा शासकीय रूग्णालयात मंगळवारीपर्यंत विलगिकरण कक्षात 498, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 280 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 1242 जण आहेत.
No comments:
Post a Comment