अंगणाचे रणांगण करून शिवाजीराव मव्हाळे यांच्या नेतृत्वात अपयशी महाविकास आघाडी विरुद्ध आंदोलन
सोनपेठ (दर्शन) : -
सोनपेठ तालुका भाजपा महाविकास आघाडी विरुध्द आंदोलन तालुक्यातील मौजे खडका येथे संपन्न सविस्तर वृत असे कि दि. 22 मे रोजी भाजपा जिल्हा सचिव शिवाजीराव मव्हाळे यांनी 'माझे अंगण माझे रणांगण' असा नारा देत मौजे खडका येथील घराच्या अंगणातून काळे झेंडे दाखवून महा विकास आघाडी सरकारच्या कोरोणा संकटातील अपयशी कारभाराचा निषेध नोंदवला.
भाजपा प्रदेश कमिटी कडून आज सकाळी 11 वाजता राज्यात सर्व ठिकाणी पक्ष नेते व कार्यकर्ते यांनी अंगणातून च काळे झेंडे व मागण्यांचे फलक घेऊन राज्य सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याची हाक देण्यात आली होती.
त्यानुसार भाजपा ग्रामीण जिल्हा सचिव शिवाजीराव मव्हाळे व इतरांनी सोनपेठ तालुक्यातील मौजे खडका येथील आपल्या घराच्या अंगणात काळे झेंडे फडकवत आंदोलन केले.
आंदोलना नंतर प्रतिक्रिया देताना शिवाजीराव मव्हाळे म्हणाले की, " महा विकास आघाडी सरकार कोरोना विषाणूला आळा घालण्यास पूर्णतः अपयशी ठरले आहे. पन्नास दिवसांच्या लॉक डाऊन नंतर ही दिवसा गणीस दोन हजार नवे रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडे कोरोणा ला आळा घालण्यासाठी कुठलीही ठोस योजना दिसत नाही. नागरिकांना ' घरात रहा बाहेर निघू नका ' असा आदेश सरकार देत आहे. पण आज दोन महिन्यानंतर सामान्य माणसाला, ग्रामीण भागातील बारा बलुतेदारांना सरकारचा कोरडा आदेश पाळून घरात राहणे शक्य नाही. सरकारने याची दखल घेऊन प्रत्येक कमावत्या व्यक्तीस तत्काळ पाच हजार रुपये मदत देण्याची गरज आहे.
शिवाय ग्रामीण भागात शेतकऱ्याचा कापूस जाचक नियम व अटीनमुळे अजुन ही पडून आहे. सरकारने शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये या साठी कापसाचे शेवटचे बोंड सुध्दा खरेदी केली पाहिजे. पीकविमा तत्काळ वाटप करून शेतकऱ्यांना बांधावर मोफत बि बियाने व खत कृषी विभागामार्फत पोचवावे तरच या संकटात शेतकरी जगू शकेल असेही ते म्हणाले.
यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्ते कृष्णा यादव यांनी प्रत्येक व्यक्तीस तीन महिने मोफत अन्नधान्य, बारा बलुतेदाराना आर्थिक मदत, निराधारांना नियमित पगार, आदी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या इतर 11 प्रमुख मागण्या ठाकरे सरकारने तत्काळ मजूर कराव्या ही माफक अपेक्षा असल्याचे बोलून दाखवले.
शिवाजीराव मव्हाळे यांच्या अंगणात सोशल डीस्टनसींग चे नियम पाळून झालेल्या या आंदोलनात उत्तम हंगे, बाळासाहेब यादव, रमेश यादव, बाळासाहेब मव्हाळे , ज्ञानोबा दत्तराव यादव, वैजनाथ खरात, कुमार मस्के आदी जन उपस्थित होते.

No comments:
Post a Comment