Sunday, May 31, 2020

14 व्या वित्त आयोगातून शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास साहित्य मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

14 व्या वित्त आयोगातून शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास साहित्य मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण 



सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज बनवणे कामी ग्रामपंचायत च्या 14 वा वित्त आयोगाच्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राला आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
        मुख्य कार्यकारी अधिकारी बि.पी.पृथ्वीराज, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, माजी जी.प. सदस्य लक्ष्मिकांत देशमुख यांचे प्रेरणेतून रविवार 31 मे 2020 रोजी शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
            तालुक्यातील शेळगाव येथे नुकतेच  प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असलेल्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधूतून वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले आहे.  
             वैद्यकीय साहित्य प्राप्त झाल्यानंतर त्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राला लोकार्पण करण्यात आले . यावेळेस कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख, प.स.सभापती प्रतिनिधी भगवान राठोड, गट विकास अधिकारी सचिन खुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष पवार, सरपंच सुधाकर मुलगुर आदिसह माजी पंचायत समिती सभापती ग्रामपंचायत सदस्य आदीची यावेळी उपस्थिती होती.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment