भारत देशात तसेच महाराष्ट्रात कोव्हीड 19 या विषाणू संसर्गदक्षता म्हणून लाँकडाउन च्या धर्तीवर परभणी जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील 560 नागरीकांना नुकतेच महाराष्ट्र शासनाने परराज्यातील सिमे पर्यंत एस.टि.बस प्रवासात या नागरीकांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी तालुका शाखेच्यावतीने बस स्थानकावर पिण्याचे पाणी वाटप तालुका अध्यक्ष अब्दुल रहीम यांनी केली.तसेच पाण्याच्या बाँटल ही सोबत भरुन दिल्या.सोमवारी 11 मे 2020 रोजी मध्यप्रदेश राज्यातील 505 तर तेलंगना राज्यातील 55 असे एकुन 560 नागरीकांना रवाना करताना उन्हाच्या भरात पाणी हेच जिवन म्हणून लाँकडाउन काळात बस स्थानकात कसलीच सोय नाही हे पाहुन अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी तालुका शाखेच्या वतीने परभणी बस स्थानकावर परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना अब्दुल रहीम, लक्ष्मण पवार व युनुस खान आदिंनी मिळुन नागरीकांना पिण्याचे पाणी वाटप केले.परराज्यातील नागरीकांची तहान भागवली त्यांनी सर्वांना मनापासून धन्यवाद दिले.


No comments:
Post a Comment