वक्तृत्व ते नेतृत्व, अमोल दादा मिटकरी यांची स्वप्नवत आमदारकी हार्दिक शुभेच्छा !
तारीख 16 मे 2019..अजित पवार आणि मिटकरी यांची पहिली भेट झाली ती धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर. या भेटीसाठी जेवढी खटपट अजित पवारांना भेटण्यासाठी लागते तेवढी खटपट मिटकरी यांनी केली.
मिटकरी यांच्या आमदारकीचा प्रवास अवघ्या एका वर्षात झालाय हे कुणाला सांगितलं तरी विश्वास बसणार नाही अशी परिस्थिती आहे. आमदारकी..तीही विधानपरिषदेची म्हणालं की पडद्यामागची आर्थिक गणितं बघून भल्याभल्यांना घाम फुटतो. घोडेबाजारीच्या नावाखाली कसे व्यवहार होतात हे कायम राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहतो. पण मिटकरी यांची आमदारकी झिरो बजेट असेल हे कुणाला पटणार नाही. (Amol Mitkari journey )

तारीख 16 मे 2019..अजित पवार आणि मिटकरी यांची पहिली भेट झाली ती धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर. या भेटीसाठी जेवढी खटपट अजित पवारांना भेटण्यासाठी लागते तेवढी खटपट मिटकरी यांनी केली. अनेकदा पीएला फोन, मेसेज..अखेर अजित दादांनी भेटीला बोलावलं..मुंबईत भेटायचं तर कोणी ओळखीचं नाही..मग मिटकरी यांनी सीएसएमटी स्टेशन गाठल्यावर शेजारी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतालयात आंघोळ उरकून घेतली..तिथून बी ५ बंगल्यावर धनंजय मुंडे यांचा बंगला असल्याचं माहिती झाल्यावर तिथं गेलो..अजित दादांची पहिलीच भेट..सर्वसाधारण व्हिजीटरसारखे अजित पवार त्यांना भेटले..पक्षासाठी काम करायची इच्छा व्यक्त केली..अजितदादांनी ऐकून जायला सांगतिलं..नंतर चर्चेअंती राज्य पातळीवर एक पद दिलं गेलं..पण पक्षातल्या पदाबरोबर आपल्या वकृत्वाचा वापर पक्ष कधी करणार असा प्रश्न मिटकरी यांना पडला होता.
मिटकरी आपली वकृत्वशैली दाखवण्यासाठी संधी शोधत होते. पण नेत्यांच्या भाऊगर्दीत ती संधी कोण देणार. अखेर ती संधी मिळाली शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं शिवस्वराज्य यात्रा काढली. शिवनेरीवरुन सुरु झालेल्या यात्रेवेळी अमोल मिटकरीचं नाव कुणालाही माहित नव्हतं..पण या यात्रेची सांगता झाली तेव्हा मिटकरी यांच्या भाषणांची मागणी राष्ट्रवादीचेच उमेदवार करत होते. वाशिममध्ये यात्रा आली असताना अवघ्या 10 मिनिटे भाषण करायची संधी मिळाली आणि त्याचं सोनं करत मिटकरी यांनी मोठा पल्ला गाठला. आतापर्यंत व्याख्यान देऊन कुटुंब चालवणारे मिटकरी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक झाले.. अर्थात शरद पवारांच्या मंजुरीशिवाय हे शक्य नव्हतं.
विरोधी पक्षावर आक्रमक आणि मुद्देसूद भाषणानं मिटकरी यांची पक्षात मागणी वाढत चालली. मग नेहमी गाडीनं प्रवास करणाऱ्या मिटकरींच्या दिमतीला पक्षाने हेलिकॉप्टर दिलं..वकृत्वाच्या जीवावर पहिल्यांदाच हवाई प्रवासाचं स्वप्नही मिटकरींनी प्रत्यक्षात उतरवलं. थोड्या नाही तर तब्बल ६५ सभा विधानसभा निवणुकीच्या निमित्तानं त्यांनी घेतल्या. पुरोगामी आणि शिवरायांचा विचार पुढं घेऊन जाणारे मिटकरी यांचा अवघ्या एक वर्षातला प्रवास राजकीय क्षेत्रातल्या बजबजपुरीत वेगळा दिसून येतो..एक साधा कार्यकर्ता ते थेट आमदार असं सध्याच्या राजकारणात होणं तसं दुर्मिळच..पण नशिबाची साथ आणि वकृत्वाच्या वरदानानं मिटकरी ते करुन दाखवलंय.
No comments:
Post a Comment