व्यापा-यांचा दिनक्रमच बदलला सकाळीच आठलाच दुकानेसुरु तर दुपारी तीन नंतर शुकशुकाट ; प्रथम पथकातील अधिकारी व कर्मचारी नियम पाळा....
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यात आँनलाँक 1 च्या पाचव्या टप्प्यात परभणी जिल्हा प्रशासनाने बहाल केलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर सोनपेठ बाजारपेठ सकाळी 8 वाजता गजबजू लागल्या आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून शहरातील बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार पूर्णतः ठप्प होते. त्या पार्श्वभूमीवर आँनलाँक 1 च्या पाचव्या टप्प्यात प्रशासनाने बहुतांश व्यवसायांना मुभा बहाल केली. त्यासाठी तारीख आणि वेळेचे निर्बंध लादले. त्यामुळे बहुतांश व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला. दि.1 जून रोजी म्हणजे सोमवारी आठवडी बाजार बंदच असल्याने भाजीपाला बाजारही अतिउत्साहात भरला तसा आँनलाँक 1पथकातील पोलिस व कर्मचारी दाखल होताच सर्व बाजार उटवण्यात आला. आनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपआपल्या दुकानातील नोकरदार वर्गास पाचारण करीत सकाळीच साफसाफईस प्रथम प्राधान्य दिले. प्रशासनाने दिलेल्या सूचनाप्रमाणे सामायीक अंतर ठेऊन तसेच सॅनिटायझरची सुध्दा व्यवस्था अनेकांनी केलेली दिसुन आली. अन् व्यवहारास सुरूवात झाली. सोमवारी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली. सोशल ड़िस्टन्सींग गोष्टीची अक्षरक्षः फज्जा उडाला. त्यामुळे व्यापारी वर्ग सुध्दा चिंतातूर झाला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी(दि.दोन) बरोबर आठच्या सुमारास बाजारपेठा सुरू झाल्या. शहरातील मध्यवस्तीसह अन्य भागातील बाजारपेठा मधून सकाळीच मोठी रेलचेल आढळली. ऐरवी बाजारपेठेतील दुकाने सर्वसाधारणपणे साडेदहा ते अकराच्या सुमारास उघडत. लग्नसराईसह अन्य हंगाम असतांना सुध्दा व्यापारी आपली घरगुती कामे आटोपूनच व्यवहार सुरू करत परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी आठ वाजता व्यापारी वर्ग पूजापाठ करीत व्यवहार सुरू करू लागले आहेत. ग्राहक वर्ग सुध्दा सकाळीच बाजारपेठेमधून फेरफटका मारीत खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण करीत आहेत. दुपारी पावणेतीन-तीनच्या सुमारास बाजारपेठेत पुन्हा शुकशुकाट होतो आहे. विशेषतः संबंधीत पोलिस ठाण्यातील हद्दीतील अधिकारी, पथक कर्मचारी आल्या पाठोपाठ बाजारपेठा तातडीने बंद होवू लागल्या आहेत.
मास्क अनेक कर्मचारी व अधिकारी वापरत नसताना दिसत आहेत परंतु प्रतेक दुकानदारास मास्क वापरा नसता उद्या दंड वसुल केला जाईल आशा इशारा देत आहेत.तरी प्रथम विशेषतः संबंधीत पथक पोलिस ठाण्यातील न.प.तील अधिकारी, कर्मचारी यांनी तोंडाला मास्क लावावा तसेच गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये,दुपारी तिन वाजता दुकान बंद करण्यासाठी पथक अधिकारी व कर्मचारी फिरत आहेत का हाँटेलवर चहा पिण्यासाठी असा प्रश्न तमाम जनता विचारत आहे. "प्रथम पथकातील अधिकारी व कर्मचारी नियम पाळा" नंतर दंड वसुल करावा आशी तमाम जनतेतुन मागणी होताना दिसत आहे.


No comments:
Post a Comment