कोरोना हेल्थ सेंटर सेवा सुरू ; 1307 पैकी 1171 जणांचे स्वॅब निगेटीव्ह पैकी पाँझीटिव्ह तिघांची प्रकृती स्थीर
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने येथील जिंतूर रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील नव्या इमारतीत कोरोना हेल्थ सेंटर सेवा शनिवार(दि.16) पासून सुरू केली आहे.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.16) येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57 संशयित दाखल झाले असून त्यामुळे संशयितांची संख्या 1317 पर्यंत पोचली आहे.
1307 पैकी 1171 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.110 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. शनिवारी 57 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, एकूण 1317 संशयितांची नोंद झाली असून विलगिकरण कक्षात 252, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 115 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 950 जण आहेत.
दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे पॉझीटीव्ह चार रूग्ण आढळून आले आहेत.
एक कोरोना मुक्त त्यास घरी सुटिदीली तर एकाच कुंटुंबातील तिघांजनांनची प्रकृती स्थीर आहे. नागरिकांनी सर्वप्रकारची खबरदारी बाळगावी. अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी सा.सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ पाठविलेल्या प्रेसनोटद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment