आज शुक्रवारी 97 संशयीत दाखल तर 1803 पैकी 1513 जणांचे स्वॅब निगेटीव्ह ; एकूण 1775 संशयितांची नोंद पैकी पॉझीटीव्ह 19 जणांवर रितसर उपचार सुरू
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी (दि.22) सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 97 संशयीत दाखल झाले असून संशयितांची संख्या 1775 पर्यंत पोचली आहे.
एकूण 1803 पैकी 1513 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 20 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर 15 संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. 22 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण 233 स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातून शुक्रवारी एकूण 101 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.जिल्हा रुग्णालयास शुक्रवारी एकूण प्राप्त झालेल्या पैकी 79 स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
जिल्हा शासकीय रूग्णालयास शुक्रवारीपर्यंत विलगिकरण कक्षात 421, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 251 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 1103 जण आहेत. कालपयर्र्ंत एकूण 16 रुग्ण पॉझीटीव्ह होते. मध्यरात्री प्राप्त अहवालानुसार चार रूग्ण पॉझीटीव्ह असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे एकूण कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 20 झाली आहे. त्यापैकी एक रूग्ण बरा होवून घरी गेला आहे. कक्षात 19 जणांवर रितसर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
No comments:
Post a Comment