रशीद इंजीनिअर यांच्या निधनाबद्दल अल्पसंख्यांक मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडून शोक व्यक्त
परभणी / सोनपेठ (दर्शन): -
मराठवाड्यातील शिक्षण, सामाजिक चळवळीतील आदर्श, थोर व्यक्तिमत्व अब्दुल रशीद इंजीनिअर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. देश व राष्ट्राचे सेवक रशीद इंजीनिअर यांच्या निधनाने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत अल्पसंख्यांक मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी शोक व्यक्त केला.
इंजीनिअर रशीद यांना पालकमंत्री नवाब मलिक यांनी श्रध्दांजली वाहिली. पुढे बोलताना ते म्हणाले की,परभणी एज्युकेशन सोसायटी परभणीचे अध्यक्ष या नात्याने वयाच्या 88 व्या वर्षापर्यंत सेवा केली व शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र कार्य केले. रशीद इंजीनिअर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड या संस्थेचे सक्रीय सदस्य होते. तामिरे मिल्लतचे उपाध्यक्ष या पदावर राहून शेवटपर्यंत समाजाची सेवा केली. त्यांच्या या कार्याला कोणीही विसरू शकत नाही. वक्फ पायलेट प्रकल्प परभणीच्या सर्वेमध्ये त्यांनी उत्कृष्ट मदत केली. आम्ही रशीद इंजीनिअर यांच्या परिवाराच्या सर्व सदस्यांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.


No comments:
Post a Comment