Tuesday, May 12, 2020

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपने ऐनवेळी नांदेडला धक्का तर लातुरला दिली संधी

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपने ऐनवेळी नांदेडला धक्का तर लातुरला दिली संधी


मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
मुंबई येथे येत्या २१ मेला विधान परिषजेची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने आपल्या ४ उमेदवारांची नावे दिली होती. मात्र,  भाजपने ऐनवेळी डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी दिली आहे. गोपछडे यांनी ८ मे रोजी आपला अर्ज भरला होता, तर काल शेवटच्या दिवशी रमेश कराड यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा (११ मे) शेवटचा दिवस होता. त्यामुळे शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांनी अर्ज दाखल केला. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांनी अर्ज दाखल आहे. तर कॉंग्रेसकडून राजेश राठोड यांनी अर्ज दाखल केला.तर ऐनवेळी भाजपकडून डॉ अजित गोपछेडे यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावत रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. रमेश कराड यांनी अचानक मुंबईत येऊन अर्ज भरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार की डमी म्हणून वापर होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु भाजपने डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांना आपला अधिकृत उमेदवार केले आहे.

No comments:

Post a Comment