Sunday, May 31, 2020

नागठाण शिवाचार्य यांच्या क्रूर हत्तेची सीबीआय चौकशी ; साधु-संतांना संरक्षण कायदा व सर्व शिवाचार्य यांना संरक्षणाची मागणी

नागठाण शिवाचार्य यांच्या क्रूर हत्तेची सीबीआय चौकशी ; साधु-संतांना संरक्षण कायदा व सर्व शिवाचार्य यांना संरक्षणाची मागणी



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ जिल्हा परभणी येथील श्री ष.ब्र. 108 नंदिकेश्वर शिवाचार्य मठ संस्थांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना मार्फत माननीय तहसीलदार यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार साहेबराव घोडके यांना नुकतेच एक निवेदन सादर करून त्या निवेदनात स्वर्गीय श्री गुरु ष.ब्र.निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज नागठाण तालुका उमरी जिल्हा नांदेड यांची दिनांक 24 मे 2020 रविवार रोजी क्रूर हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा तसेच सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, सर्व साधु-संतांना संरक्षण कायद्याची निर्मिती करून तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील सर्व विरशैव मठ संस्थांनच्या मठाधिपती शिवाचार्य यांना तात्काळ संरक्षण पुरविणे आदी मागण्यांचे निवेदन देऊन विनंती करण्यात आली या निवेदनावर मठाधिपती श्री गुरु ष.ब्र. 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, संतोष प्रभुअप्पा निर्मळे, किरण रमेश स्वामी, महेश पद्माकर स्वामी, सुरेश रामलिंग पोपडे, अमृत महालिंग स्वामी, सुहास सुभाषअप्पा नित्रुडकर, प्राध्यापक महालिंग मेहत्रे सर आदिंच्या स्वाक्षरी आहेत.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment