Saturday, May 30, 2020

परभणी जिल्ह्यातील व्यापारास एक दिवसाआड का आसेना सर्व दुकानांना मुभा द्या.....

परभणी जिल्ह्यातील व्यापारास एक दिवसाआड का आसेना सर्व दुकानांना मुभा द्या.....


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या 67 दिवसांपासून अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त छोटे-मोठे व्यवसाय पूर्णतः बंद असून त्याचा परिणाम दुकान मालकांसह नोकरदार व अन्य अभुतपुर्व अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने एक दिवसाआड का होईना छोटया-मोठ्या व्यवसायांना अटी व शर्तीवर परवानगी बहाल करावी, अशी मागणी महापौर सौ.अनिता रविंद्र सोनकांबळे व उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी शनिवारी (दि.30) जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांची भेट घेवून केली.
महापालिकेतंर्गत या दोघा पदाधिका-यांसह मनपा सदस्य सचिन अंबिलवादे, गुलमीर खान यांच्यासह विनोद कदम, नागनाथराव काकडे, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संपत सवणे आदीनी शनिवारी दुपारी जिल्हाधिका-यांची भेट घेतली. त्यातून एक तपशीलवार निवेदन सादर केले. त्यात कापड दुकान, चप्पल-बुट, रेडिमेड, सोनार कारागीर, जनरल स्टोअर्स, बांगडी, मोबाईल शॉपी व रेपेरिंग, घडयाळ दुरूस्ती व विक्री, भेळपुरी, पंक्चर, हॉटेल पार्सल, हेअर सलुन, क्राप, ब्युटी पार्लर, स्टेशनरी, मिठाई, फोटो स्टुडिओ, फोटो प्रेममेकर, डिस्पोजल दुकाने, क्रॉकरी, फर्निचर वगैरे दुकांनाना कमीत कमी एका दिवसाआड का होईना परवानगी बहार करावी, असे या शिष्टमंडळाने म्हटले आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752. 

No comments:

Post a Comment