Saturday, May 23, 2020

छोट्या व मध्यम वृत्तपत्रांची प्रलंबित जाहिरात देयके तात्काळ देऊन त्यांना विशेष पॅकेज कोरोना काळातून बचावासाठी द्यावे ... (मराठी पत्रकार परिषदेची राज्य शासनाकडे मागणी)

छोट्या व मध्यम वृत्तपत्रांची प्रलंबित जाहिरात देयके तात्काळ देऊन त्यांना विशेष पॅकेज कोरोना काळातून बचावासाठी द्यावे ...
(मराठी पत्रकार परिषदेची राज्य शासनाकडे मागणी)


मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोना तील दोन महीण्याचे लाॕकडाऊन   मुळे छोटी व मध्यम वृत्तपञे ही प्रचंड अडचणीत व आर्थिक संकटात सापडले आहेत या वृत्तपत्राची शासनाकडील प्रलंबित देयके तात्काळ देऊन या वृत्तपत्रांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी विशेष पॅकेज राज्यशासनाने द्यावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री  यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोरोना चे नैसर्गिक संकटामुळे गेल्या दोन महिन्यापासून या संकटापासून वाचण्यासाठी शासनाने देशभरात लाॕकडाऊन  जाहीर केला आहे यामुळे छोट्या वृत्तपत्रांचे वितरण पूर्णपणे बंद आहे छोटी व मध्यम वृत्तपत्रे हे या काळात वितरण व्यवस्था व जाहिराती बंद असल्यामुळे प्रचंड अडचणीत आले आहेत यामुळे राज्य शासनाने या वृत्तपत्रांचा विचार करून  ही वृत्तपत्रे खऱ्या अर्थाने शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारी व सर्वसामान्यांना न्याय देणारी वृत्तपत्रेही असल्यामुळे या वृत्तपत्रांची शासनाकडे प्रलंबित असणारी सर्व जाहिरात देयके तात्काळ देऊन या वृत्तपत्रांना जाहिरात स्वरूपात विशेष शासकीय अनुदानाची मदत करावी व विशेष पॅकेज या मध्यम व लघु वृत्तपत्रांना जाहीर करावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री व मुख्य सचिव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली असून या निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक अध्यक्ष गजानन नाईक कार्याध्यक्ष शरद पाबळे सरचिटणीस संजीव जोशी कोषाध्यक्ष विजय जोशी प्रसिद्धीप्रमुख अनिल महाजन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत व हे निवेदन संबंधिताला पाठवण्यात आले असून यासाठी पाठपुरावाही परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. सर्व जिल्हा संघाचे वतीने पालकमंञ्याना निवेदन देण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment