उमरी तालुक्यातील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतिनाथ महाराजांचा माथेफिरुने गळादाबुन खून केला....; भावपुर्ण श्रदांजली
उमरी (जि.नांदेड) / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतिनाथ महाराजांचा रात्री दीड वाजताच्या सुमारास खून झाला असून या घटनेने भाविकात एकच खळबळ उडाली आहे. गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला.गळा दाबून महाराजांची हत्या केली. महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला.ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. लगेच महाराजांचे प्रेत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून याठिकाणी भाविकांना ही माहिती समजताच एकच खळबळ माजली.तमाम विरशैव समाज बांधव तमाम शिष्यगण आदिंच्या वतिने भावपुर्ण श्रदांजली अर्पण करण्यात आली.


No comments:
Post a Comment