सोनपेठ न.प.च्या सर्व व्यापारी संकुलातील तसेच जागेचे व्यापा-यांचे तिन महिन्यांचे भाडे माफ करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
सोनपेठ (दर्शन) :-
कोविड 19 च्या महामारी मुळे महाराष्ट्र राज्यात 22 मार्च पासून लॉकडाऊन असल्याने शहरातील आत्यावश्याक सेवा वगळता इतर सर्व छोट्या मोठ्या व्यापारी बांधवांचे दुकाने व व्यवसाय बंद असल्याने व्यापारी बांधवांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर नगर परिषदच्या व्यापारी संकुलातील तसेच जागेचे व्यांपा-याना दिलेल्या गाळ्यांचे भाडे व न.प.च्या मालकीच्या मोकळ्या जागेचे मार्च महिन्या पासून तिन महिन्या पर्यंतचे भाडे व्यांपा-याना माफ करण्यात यावे अशी मागणी मुख्याधिकारी सौ.सोनमताई देशमुख यांना संभाजी ब्रिगेड परभणी जिल्हा अध्यक्ष शिवाजी कदम यांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment