Saturday, May 23, 2020

महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकरांची आढावा बैठक, कोरोना हेल्थ सेंटरला भेट ; येथिल असुविधां बद्दल अधिकाऱ्यांची खरडपट्टी

महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकरांची आढावा बैठक, कोरोना हेल्थ सेंटरला भेट ; येथिल असुविधां बद्दल अधिकाऱ्यांची खरडपट्टी



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्ह्यातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असणा-या रुग्णां करिता येथील आय टि आयच्या नवीन इमारतीत सुरू केलेल्या कोरोना हेल्थ सेंटर मधील आरोग्य विषयक असुविधां बद्दल विभागीय महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांची कठोर शब्दांत कान उघडणी करीत सुमारे अर्धातास खरडपट्टी काढली.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या जिल्ह्यातील उपाययोजनांसह सुविधांबाबत विभागीय महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शनिवारी (दि.23) आढावा बैठक घेतली. त्याप्रमाणे ते जिल्हा दौ-यावर दाखल झाल्या बरोबर शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात गेले. तेथील आयोजित केलेल्या एका बैठकीद्वारे आढवा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश डाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकरराव देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या, संशयीत रुग्णांची संख्या, परजिल्ह्यातून, परराज्यातील जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींच्या वैद्यकीय तपासण्या, केल्या गेलेल्या क्वारंटाईनसह बाधित व संशयीत रुग्णांवरील औषधोपचार, वैद्यकीय अधिका-यांसह कर्मचा-यांना मिळणारे साहित्य वगैरे गोष्टी बाबत आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी तपशीलवार माहिती घेतल्याचे खात्रीशीर सुत्राकडुन समजते. आयुक्तांनी तेथून कोरोना हेल्थ सेंटरच्या पाहणीचा निर्णय घेतला. तेथून ते लगेच हेल्थ सेंटरला पोचले. तेथील कोरोना बाधित रूग्ण तसेच त्यांच्या कुटुंबियां बरोबर आयुक्त केंद्रेकर यांनी हितगुज केले. यावेळी काहीनी अडीअडचणी मांडल्या. दुर्लंक्ष होत असल्याच्या तक्रारी केल्या. हेल्थ केअर सेंटर मध्ये ऑक्सीजन उपलब्ध नसल्याची बाबत आयुक्त केंद्रेकर यांच्या निदर्शनास आली तेव्हा आरोग्य विभागाच्या अधिका-यांना केंद्रेकर यांनी अक्षरक्षः धारेवर धरले. वैद्यकीय सुविधाबद्दल तपशीलवार माहिती घ्यावयास सुरूवात केली. तेव्हा तेथील त्रुटीवरून केंद्रेकर यांनी कठोर शब्दांत जबाबदार अधिका-यांची खरडपट्टी काढली.
माणुसकीचे दर्शन घडवा
या आपत्तीच्या काळात अधिकारी-कर्मचा-यांनी कर्तव्य तत्पर रहावे, कोणत्याही प्रकारची कुचराई करू नये, रुग्णांना सर्वोत्तपरी मदतीचा द्यावा, असे स्पष्ट करीत आयुक्त केंद्रेकर यांनी आपणास शासनाद्वारे गलेलठ्ठ वेतन मिळते,याचं भान राखून इनामे इतबारे काम करावे,असेही सुनावले.

No comments:

Post a Comment