Sunday, May 24, 2020

शिवा संघटनेच्या आक्रमक पावित्र्यानंतर नागठान मठादिपतींच्या खुनाचा आरोपी गजाआड

शिवा संघटनेच्या आक्रमक पावित्र्यानंतर नागठान मठादिपतींच्या खुनाचा आरोपी गजाआड



नागठाण / सोनपेठ (दर्शन) :-
 
काशी मठाच्या अंतर्गत असलेल्या नागठान (जि.नांदेड) मठाचे मठापती श्री.ष.ब्र.१०८ निर्वान रूद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांचा आज सकाळी २.३० ते ३.०० वाजेच्या सुमारास *आरोपी साईनाथ आनंद लिंगाडे* यांने निर्गुण खुन केली व या बरोबर हा प्रकार पाहणा-या अजुन एका इसमाचाही खुन करून फरार झाला. खुनाची वार्ता वेळीच मठाच्या पुजा-याने पोलीसांना फोन करून देऊनही पोलीस एक तास उशिरा पोहचले, या हलगर्जी पणामुळे आरोपी फरार झाला.
       या *दुहेरी खुनाचा निषेध करत शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.मनोहरजी धोंडे सरांनी एस.पी. श्री विजयकुमार मगर व डि वाय एस पी श्री संदीप पाटील यांना फोन करून आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला* व संध्याकाळी *पाच वाजेच्या आत आरोपीला अटक करा अन्यथा प्रेत ताब्यात घेणार नाही व तोवर त्यांचा अंत्यविधी करणार नसल्याचे सागितल्याने पोलीसांची तारांबळ उडाली शोधा शोध सुरू झाली.*
मा.प्रा.मनोहरजी धोंडे सरांच्या आवाहनावरून शिवा संघटनेच्यावतीने सकाळी सदर घटनेचा निषेध करत आंदोलनाच्या इशा-याची पोस्ट व आरोपीचे नाव व फोटो सोशल मीडियावर शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेअर केल्याने सदर पोस्ट वरील आरोपीचे नाव व फोटो पाहून मौजे तानुर जि. आदीलाबाद (तेलंगाना) येथील शिवा संघटनेचे सरपंच यांना आरोपी आठळुन येताच त्यांनी त्याला पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले.
   आरोपी दुपारी २.३० वाजता पोलिसांच्या ताब्यात आल्यामुळे घोषित केल्याप्रमाणे आता रितसर धर्मपरंपरे प्रमाणे नागठान मठाचे मठाधिपती *शिवैक्य ष.ब्र.१०८ निर्वान रूद्र पशुपती शिवाचार्य महाराज* यांचा *_अंतिम संस्कार_* करणार असल्याचे शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.मनोहरजी धोंडे सर यांनी जाहीर केले आहे.

No comments:

Post a Comment