सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुंजाभाऊ धोंडगे यांनी माननीय तहसीलदार यांना दिनांक 18 मे 2020 रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे शेतकरी व मजुरांच्या बाबतीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकरी , मजूर व छोटे व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत त्यासाठी खालील विविध मागण्या संदर्भात तालुक्याचे प्रमुख म्हणून आपन दखल घेणे बाबत निवेदनात शेतकऱ्यांचा कापूस सरसकट खरेदी करण्याचे आदेश सीसीआय व पणन महासंघाला देणे, पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याच्या अनुषंगाने दररोज जास्तीत जास्त वाहने घेण्याबाबत कारवाई करणे, पुणे मुंबई व महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून व परराज्यातून आलेल्या कामगारांना काम व अन्नधान्य पुरवठा करावा, परभणी जिल्हा ग्रिन झोन मध्ये असल्यामुळे तालुक्यातील बाजारपेठ सुरू करावी, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची योग्य तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करावा आदी मागण्या ची आपण स्वतः या दखल घेऊन आदेशीत करावे. निवेदनाच्या प्रती माननीय जिल्हाधिकारी परभणी, माननीय सहाय्यक निबंधक सोनपेठ, माननीय जिल्हा निबंधक सहकारी संस्था परभणी आदींना दिले असून या निवेदनावर प्राध्यापक मुंजाभाऊ धोंडगे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी यांची स्वाक्षरी आहे .

No comments:
Post a Comment