Monday, May 11, 2020

मालवाहू गाडीचे डिझेल इंजिन स्थानकावरून रेल्वेरूळावरून घसरले आणि विजेच्या डीपीस धडकले जिवीतहानी नाही

मालवाहू गाडीचे डिझेल इंजिन स्थानकावरून रेल्वेरूळावरून घसरले आणि विजेच्या डीपीस धडकले जिवीतहानी नाही



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

पूर्णा येथील रेल्वे स्थानकावर सोमवारी (दि.11) दुपारी साडेचारच्या सुमारास एक डिझेल इंजिन रेल्वे रूळावरून घसरून डीपीस जावून धडकले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
मालवाहू गाडीचे डिझेल इंजिन स्थानकावरून  रूळ चेेंज करण्याकरता निघाले असतांना अचानक ते रेल्वेरूळावरू घसरले आणि वेगाने पुढे जावून प्लॉटफॉर्मच्या बाजूच्या विजेच्या डीपीस जावून  धडकले. सुदैवाने कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही किंवा जीवीतहानी झाली नाही. याप्रकरणानंतर रेल्वे अधिकारी, कर्मचा-यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अन् ते इंजिन तेथून हालविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. घटनामागील कारण सायंकाळी उशिरापर्यंत कळू शकले नाही. दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या अधिका-यांनी अधिकृत असा तपशील ही दिला नाही.

No comments:

Post a Comment