Sunday, May 31, 2020

परभणी जिल्ह्यातील चार प्रश्‍न चुटकीनिशी दूर कोविड 19 ; समितीद्वारे कठोर उपाय

परभणी जिल्ह्यातील चार प्रश्‍न चुटकीनिशी दूर कोविड 19 ; समितीद्वारे कठोर उपाय




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणुचा प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयासह कोविड हॉस्पीटल वर नियुक्त केलेल्या समितीने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या आदेशा प्रमाणे अवघ्या एका दिवसात चार प्रश्‍न चुटकीनिशी दूर केले.
जिल्हा रुग्णालयातंर्गत कर्तव्या वरील वैद्यकीय अधिका-यांसह परिचारिकांच्या निवासाकरिता या समितीने मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत सुसज्ज असे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे वसतीगृह ताब्यात घेतले असून त्या पाठोपाठ संशयीतांचे स्वॅब घेण्याकरिता व डाटा संकलीत करण्याकरिता काही कर्मचारी नव्याने नियुक्त केले असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी सा.सोनपेठ दर्शनशी बोलतांना दिली.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीतील कोेरोना हेल्थ सेंटरवरील समस्यांवर सुध्दा या समितीने तात्काळ लक्ष घातले. अन् तेथील सांडपाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अवघ्या काही तासात दूर केला. विशेषतः सांडपाण्याकरिता त्या परिसरातील विहिरीचा पूर्णतः गाळ काढून घेतला अन् त्या इमारतीच्या सांडपाण्याचा प्रश्‍न सोडविला. पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी तातडीने त्या ठिकाणी बोअर पाडण्यास मंजुरी दिली.
या व्यतिरिक्त क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींसह कुटुंबियांसाठी चांगला प्रतीचा नाश्ता व जेवण उपलब्ध करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी दिले आहेत. या इमारतीचा वीज पुुरवठा सुरळीतपणे रहावा, यादृष्टीने जिल्हाधिका-यांनी त्या ठिकाणी स्वतंत्र कनेक्शन व डीपी उभारण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना दिल्या. पाठोपाठ त्यासाठी 4 लाख रूपयांची तरतूद करीत ती कंपनीकडे जमा केली. त्यामुळे त्या इमारतीत 24 तास सुरळीत असा वीज पुरवठा राहणार आहे.

No comments:

Post a Comment