Friday, May 15, 2020

शेवड़ी हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिंतूर शहर व परिसरात संचारबंदी लागू

शेवड़ी हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिंतूर शहर व परिसरात संचारबंदी लागू



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावात 3 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असल्याने जिंतूर शहरात संचारबदी लागू करणे आवश्यक आहे. त्याअर्थी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 कलम 144 नुसार शेवड़ी हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.  तर जिंतूर नगर परीषद हद्दीत आणि जवळच्या 3 कि.मी. परीसरामध्ये शनिवार दि.16 मे 2020 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी.म.मुगळीकर यांनी जारी केले आहेत.
          संचारबंदीतुन  सर्व शासकीय कार्यालये त्यांचे कर्मचारी व  त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने , सर्व औषधी दुकाने व वैद्यकीय कर्मचारी , वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेली वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपात्काल व त्यासंबंधी सेवा, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी,  प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे संपादक व वार्ताहर तसेच प्रतिनिधी आणि वितरक,  पेट्रोलपंप वितरक व कर्मचारी आणि त्यांची वाहने,  दुध विक्रेत्यांना  घरोघरी जावून सकाळी 6 ते  9 या कालावधीत दूध विक्री करणे,  खत वाहतूक त्यांचे गोदामे व दुकाने आणि त्यांच्यासाठी लागणारी वाहने व कामगार, राष्ट्रीयकृत बँका  केवळ रास्तभाव दुकानदारांकडून चलनाव्दारे पैसे भरणा करणे आदी व्यक्ती व समूहाला सुट राहील.
             संचारबंदीतून सूट दिलेल्या बाबीशिवाय संचारबदी लागू केलेल्या भागात इतर कोणतीही व्यक्ती व वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल. सदरील आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक, उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग जिंतूर , अन्न व प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त, तालुका दंडाधिकारी जिंतूर व मुख्याधिकारी नगर परीषद जिंतूर यांच्यावर राहील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
                          -*-*-*-*-

No comments:

Post a Comment